निदान चाचण्या आणि सहाय्यक काळजी

निदान चाचण्या आणि सहाय्यक उपचार

पुरुषांसाठी

चाचणीचे नाव
हे का केले जाते
वीर्य तपासणी
पुरुषांमधील वंध्यत्वाचे मूल्यमापन करण्यासाठी वीर्य तपासणी ही मूलभूत आणि महत्त्वाची चाचणी आहे. शुक्राणूंची संख्या, हालचाल (मोटिलिटी) आणि आकार (मॉर्फोलॉजी) तपासण्यासाठी. वीर्याचे निष्कर्ष असामान्य असल्यास नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते.
हार्मोन चाचणी (टेस्टोस्टेरॉन, FSH, LH)
शुक्राणूंची संख्या कमी असल्यास, त्यामागे हार्मोन्स कारणीभूत आहेत का हे पाहण्यासाठी केली जाते
वृषणकोशाची सोनोग्राफी (स्क्रोटल अल्ट्रासाऊंड)
वृषणकोशाची सोनोग्राफी (फक्त गरज असल्यास) वृषणांमध्ये सूज किंवा अडथळा आहे का, हे तपासण्यासाठी
प्राथमिक तपासण्या

स्त्रियांसाठी

चाचणीचे नाव
हे का केले जाते
ओव्हुलेशन चाचणी (प्रोजेस्टेरॉन रक्त चाचणी)
ओव्हुलेशन चाचणी (प्रोजेस्टेरॉन रक्त चाचणी) दर महिन्याला तुमचे स्त्रीबीज बाहेर पडते (ओव्हुलेशन होते) का, हे तपासण्यासाठी
AMH चाचणी
तुमच्याकडे किती स्त्रीबीजे आहेत (स्त्रीबीज साठा) हे तपासण्यासाठी • AMH जास्त: चांगला साठा; AMH कमी: कमी झालेला साठा. • IVF सारख्या प्रजनन उपचारांना स्त्री कसा प्रतिसाद देईल याचा अंदाज बांधण्यास मदत होते. • वयानुसार AMH नैसर्गिकरीत्या कमी होत जाते आणि रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) जवळ ते खूप कमी असते.
FSH, LH (पाळीच्या 2–5 व्या दिवशी रक्त चाचणी)
तुमचे मासिक चक्र नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सची पातळी तपासण्यासाठी
थायरॉइड चाचणी (T3, T4, TSH)
मासिक पाळी आणि प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकणाऱ्या थायरॉइडच्या समस्या नाहीत ना, हे तपासण्यासाठी
प्रोलॅक्टिन चाचणी
प्रोलॅक्टिनच्या जास्त पातळीमुळे ओव्हुलेशन थांबत आहे का, हे तपासण्यासाठी
ओटीपोटाची सोनोग्राफी (पेल्विक अल्ट्रासाऊंड)
तुमचे गर्भाशय आणि अंडाशय निरोगी आहेत का (सिस्ट, फायब्रॉइड्स इत्यादी), हे पाहण्यासाठी
HSG (गर्भाशय आणि नलिकांचा एक्स-रे)
तुमच्या फॅलोपियन नलिका मोकळ्या आहेत का (अडथळा नाही ना), हे तपासण्यासाठी
प्रजननाविषयी जागरूकता

नैसर्गिक नियोजन

शारीरिक संबंधांसाठी योग्य वेळ निवडा
गर्भधारणेची सर्वाधिक शक्यता 6 दिवसांच्या फलनक्षम कालावधीत (fertile window) असते, विशेषतः ओव्हुलेशनच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी स्त्रीबीज बाहेर पडते (साधारण 14 वा दिवस). या काळात दररोज किंवा एक दिवसाआड शारीरिक संबंध ठेवणे उत्तम.

ओव्हुलेशनचा मागोवा घ्या

आरोग्यदायी आहार घ्या

स्त्रियांसाठी

पुरुषांसाठी

शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा
वजन खूप कमी किंवा खूप जास्त असल्यास प्रजननक्षमता कमी होते. लठ्ठपणामुळे स्त्रियांमध्ये ओव्हुलेशन आणि स्त्रीबीजाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, तर पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. बॉडी मास इंडेक्स (BMI) च्या मदतीने व्यक्तीचे वजन कमी, सामान्य, जास्त आहे की ती लठ्ठ आहे हे ठरवता येते. BMI कॅल्क्युलेटर वापरून हे सहज तपासता येते. आदर्श BMI 18.5 ते 25 असतो.

नियमित व्यायाम करा

ल्युब्रिकंट वापरा, पण काळजीपूर्वक

सहाय्यक प्रजनन तंत्रे

IUI, IVF, ICSI – काय, कधी आणि कसे

चाचणीचे नाव
हे का केले जाते
IUI (इंट्रायुटेरिन इन्सेमिनेशन)
कृत्रिम गर्भधारणेचा एक प्रकार, ज्यात शुक्राणू थेट स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात कधी: पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवसापासून औषधे दिली जातात प्रक्रिया: गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी शुक्राणू थेट स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात
IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन)
अशी प्रक्रिया ज्यात फलन शरीराबाहेर होते आणि भ्रूण गर्भाशयात ठेवला जातो कधी: पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवसापासून हार्मोनची इंजेक्शन्स दिली जातात प्रक्रिया: यात शरीराबाहेर स्त्रीबीज आणि शुक्राणू एकत्र करून भ्रूण तयार केले जातात आणि नंतर गर्भधारणा होण्यासाठी ते गर्भाशयात ठेवले जातात
ICSI
IVF चा एक प्रकार, ज्यात एकच शुक्राणू थेट स्त्रीबीजाच्या सायटोप्लाझममध्ये इंजेक्ट केला जातो कधी: IVF प्रमाणेच – पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवसापासून हार्मोनची इंजेक्शन्स सुरू होतात प्रक्रिया: गर्भधारणेस मदत व्हावी म्हणून एकच शुक्राणू थेट स्त्रीबीजात इंजेक्ट केला जातो
प्रगत पर्याय

फ्रीझिंग, दाता, सरोगसी, जनुकीय चाचणी

  1. तृतीय-पक्ष प्रजनन (Third-Party Reproduction):

 

प्रजननक्षमता जतन (Fertility Preservation):

प्रजननाशी संबंधित अडचणी असलेल्या / धोका असलेल्या स्त्रियांसाठी:

पुरुषांसाठी 

 

शुक्राणू निवडीची प्रगत तंत्रे:

 

इतर सहाय्यक उपचार: